Tuesday, November 15, 2016

आम्ही सुध्दा हिन्दुच आहोत..


स्मशाणात स्मशाण शांतता होती. मुख्य स्मशान मंडपाच्या बाहेर असलेल्यांमध्ये थोडी कुजबुज सुरु होती. मांमाच्या मुलाने उलटा हात करुन बोंब मारली. आणि  अंतविधीच्या जळणा-या सरणाशेजारीच उभ्या उभ्या एक जण बोलु लागला. मरणाच्या वाटेवर देखील लोक बोलतात हे माहीत होते व असे बोलणे ऐकण्याची व बोलणा-याची किव येते नेहमीच. पण आज हा जो माणुस बोलु लागला तस तसे कान अधिक सतर्क होत गेले व त्याचा शब्दनशब्द झेलण्याचा प्रयत्न करु लागले. वक्त्याने मामांविषयी बरीच माहीती सांगितली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केले, किती त्याग केला, कशाप्रकारे "ह्या एकाम्ड्या शिलेदाराने" संघाचे काम तालुक्यात रुजवले व चांगली पीढी हाताशी येईपर्यंत ते टिकवले...सोबतच आणीवाणीच्या काळात कशापकारे मारुतराव वाल्हेकरांच्या ऐवजी "मला अटक करा" म्हणुन १९ महीने तुरुंगवास भोगला हे देखील या वक्त्याने सांगितले. पुढे तो जे बोलला ते मात्र अनपेक्षित व संघ कार्याची महत्ता, गौरव एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवणारे होते. शब्दशः नाही पण सार पुढील प्रमाणे आहे..ते असे , "आम्ही मुसलमान असलो तरीही आधी आम्ही हिन्दु आहोत, व मामांनी आम्हाला आमच्या हिन्दुत्वाची जाणीव करुन दिली"...  हा जो वक्ता होता त्याचे नाव त्याने सांगितले ते असे " मुनीरभाई मुलाणी"..
स्मशानभुमीतील अंत्यविधीच्या वेळी एका निष्टावंत संघकार्यकर्त्याच्या शोकसभेची सुरुवात मुनीरभाईंच्या भाषणाने झाली होती. मुनीर भाईंनंतर देखील बरेच वक्ते बोलले. सगळ्यांनी आपापल्या परीने मामांच्या जीवनाचा, आदर्शाचा गौरव केला, शेवटी संघाचे प्रांत प्रचारक अतुल लिमये हे देखील बोलले. पण बाकी कोण काय बोलले याकडे लक्ष गेलेच नाही, कारण मुनीरभाईंनी उच्चारलेले "आम्ही हिन्दुच आहो"  हे वाक्यच सतत घुमत राहीले.
अगदी घरी, नंतर ऑफीस, रात्री झोपेपर्यंत तेच वाक्य तेच शब्द..आणि प्रश्न की मामांनी हे कसे काय साधले?

श्री गुरुजींचे "विचारधन" म्हणजे संघाची वैचारीक बैठक म्हणता येईल. किंबहुना संघाची विचारधारा गुरुजींनी त्यांच्याकाळात शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला तो या पुस्तकात. कालानुरुप संघसरीता वाहतेच आहे. सोबत अनेक चांगल्या गोष्टी घेत व कालबाह्य, अतार्कीक सोडुन देत, संघ अविरत कार्यरत आहे. कदाचित आता जर कुणी संघाची फिलोसॉफी लिहिण्यास सुरुवात केली तर "विचारधन" पेक्षा अनेक जास्त मुद्दे जे सामाजिक जीवनाच्या एकात्म विकासासाठी आवश्यक आहेत असे लिहिले जातील. म्हणजेच काय तर संघ परीवर्तनशील आहे व उत्क्रांतवादी आहे, काळानुरुप बदलास सदैव तत्पर आहे. असे असले तरी संघाचे मुळ कार्य , ध्येय, उद्दीष्ट जर कोणते असेल तर आहे, कार्यकर्ता घडवणे. व संघाने हे काम स्थापने पासुन अविरतपणे केले आहे. यात बदल नाही झाला व होणार देखील नाही. हिन्दुराष्ट्रवाद म्हणजे काय हे आजकाल च्या तथाकथित "रॅशनल" म्हणवुन घेणा-या पीढीला(त्यातही जन्माने हिन्दु असणा-यांना देखील) मोठे मोठे लेख, पुस्तके, लेक्चर्स देऊन समजणार नाही. स्वतःला हिन्दु म्हणवुन घेणे म्हणजे प्र्तिगामी वाटावे इतपत हिन्दुत्वाची लाज आजकाल तरुणांना वाटते. पण मामांनी जवळ जवळ ५० वर्षापुर्वी कोणत्या निष्टेने स्वतःस संघकार्यास वाहुन घेतले असेल की जेणे करुन "हिन्दुराष्ट्रवाद" ते एका मुसलमानास समजावु सांगु शकले.
मी मामांना १८ वर्षांपासुन ओळखतो आहे. वेगवेगळ्या वर्गांत, शिबिरांत मामा नेहमी उपस्थित असायचे. पण मामांनी कधी भाषण केलेले मला आठवत नाही. हो गप्पा खुप मारायचे. मागच्या एक दोन वर्षात मामांची गाठ घेता आली नाही. पुर्वी पौड ला गेलो की आवर्जुन मामांना भेटायला त्यांच्या घरी जाणे ठरलेलेच. मामांप्रमाणेच घरचे बाकी सदस्य देखील मायाळु व अगत्याने पाहुणचार करणारे आहेत. मामा नेहमीच्या त्यांच्या जागी काहीतरी लिहित असायचे किंवा काहीतरी कारीगरीचे काम करीत असायचे. मामांना मोडी लिपीचे ज्ञान होते, त्यामुळे दुरदुरुन लोक जुने कागदपत्र घेऊन त्यांचे कडे येत मराठीत भांषांतरासाठी. मामा देव सुध्दा बनवीत. देवाचे टाक मांमांच्या इतके सुबक, रेखीव तालुक्यात अन्य कुणीच बनवीत नाही. माझ्या घरचे टाक देखील मामांनीच बनवले आहेत. तर मामांकडे गेले की एकीकडे हातातील काम न थांबवता ते आल्या गेलेल्यांशी मनमोकळे पणाने गप्पा मारीत. मी अनेकदा गेलोय त्यांच्याकडे, पण त्यांनी कधी "संघाचे काम कर" असा उपदेश केला नाही. संघाचे काम ईश्वरी काम आहे असे त्यांना भेटुन, त्यांना पाहुन नेहमीच वाटले.

स्वच्छ वैयक्तिक जीवन, पारदर्शी सामाजिक जीवन, सत्य ,अस्तेय,  अपरीग्रह असे अनेक पैलु त्यांच्या व्यक्तित्वाचा अतुट भाग होते. "इदं न मम" या भावनेने जे जे अर्जित केले ते ते "राष्ट्राय स्वाहा" कसे करावे याचे उदाहरण म्हणजे आमचे कैलासवासी मामा शेरेकर. याच सदगुणाच्या जोडीने माझ्यासारख्या अनेकांवर कायमचा राष्ट्रभक्तीचा संस्कार करणारे मामा शेरेकर एका मुसलमान माणसास देखील भावतात हे सर्वात मोठे आश्चर्य. नुसतेच भावलेले नाही मामा, तर संघाचा जो राष्ट्रवाद आहे तो त्यांच्या आयुष्यात जसाच्या तसा अवतरीत झाले, प्रकट झालेला दिसतो. आजकाल जिथ भारतीयांना स्वतःला "हिन्दु" म्हणवुन घेण्याची लाज वाटते आहे, तिथे एका मुस्लीम व्यक्तिने दिवंगत मामांच्या शोकसभेत मामांविषयी व स्वतःया "हिन्दु" असण्याविषयी काढलेल्या उद्गाराने मामांच्या जीवनाचे सार्थक झाले हेच म्हणावेसे वाटते.

स्वतःच्या गुणकर्माने मामांनी नक्कीच परलोकी स्वतसाठी योग्य ती "गती" मिळवली असेलच. त्यामुळे ह्या पुण्यात्म्यासाठी माझ्यासारख्या पामराने प्रार्थना करावी इतका मी मोठा नक्कीच नाही. पण त्यांच्याकडुन , त्यांच्या जीवनाकडुन आमच्या सारख्या अनेकांना हा राष्ट्रभक्तीचा वारसा, प्रेरणा, स्फुर्ती सदोदीत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

नतमस्तक
हेमंत सिताराम ववले


Friday, November 11, 2016

हिन्दुत्व पुन्हा एकदा

हिन्दु , हिन्दुत्व पुन्हा एकदा.


नुकत्याच लंडन मध्ये झालेल्या हिन्दु स्वयंसेवक संघाच्या महाशिबिरात, संघाचे सरसंघचालक, मोहन जी भागवत, यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करुन, अर्थाची ओढाताण करुन प्रसिध्दी माध्यमांनी चुकीच्या मथळ्याखाली बातम्या दिल्या..त्या पार्श्वभुमीवर, हिन्दु, हिन्दुत्व म्हणजे नेमके काय याचा मागोवा थोडक्यात घेण्याचा हा प्रयत्न. आशा आहे खालील विवेचन वाचुन हिन्दु, हिन्दुत्वा विषयी असलेले गैरसमज दुर होतील..फक्त वाचकाने पुर्वग्रह बाजुला ठेवुन वाचावे हि विनंती...

मुळात हिन्दुत्वाला इतर सांप्रदायांच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते, नव्हे आहे. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता दिला. याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात यात काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो करोडों लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. 

पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल... माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्यावर आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. 
अस्तु.
हेमंत ववले.

सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे


"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे",

..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार 

परवा २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बसेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला.
पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे. निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्याशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणी वाचुन काही नेऊ नका"
आपल्या ऐतिहासिक वास्तु म्हणजे आपली साम्स्कृतिक धरोहर आहेत. त्यांचे जतन झाले पाहीजे. त्यांचा अभ्यास झाला पाहीजे. नवनवीन पिढ्यांना या वारश्याविषयी नीट माहीती करुन दिली गेली पाहीजे. व आणखी महत्वाचे म्हणजे या वास्तुंविषयी गर्हनीय भाव जनलोकांत निर्माण केला पाहीजे. हे आणि असे ही बरेच संस्कार वरील मंडळींनी बोलुन नव्हे तर त्यांच्या कृतीतुन आमच्या सारख्या अनेकांच्या मनावर केले आहेत.

परवाच्या तोरणा भेटीत वरील "दुर्गसंस्काराचा" -हास होत असलेला प्रकर्षाने जाणवला. सलग तीन दिवस सुट्ट्या, वाहनांच्या सुविधा, इत्यादी गोष्टींमुळे किल्ले पाहणे हा संस्कार न राहता तो आता फक्त "सहल", "मजा" व विरंगुळा राहीलेला आहे असेच खेदाने म्हणावे लागते. काही गोष्टी जाणवल्या त्यावर जाणकारांनी, दुर्ग प्रेमींनी, दुर्ग संवर्धकांनी अवश्य चिंतन करावे...

आम्ही किल्यावर जाण्यासाठी निघालो खरे पण वेल्हे गावात, पोहोचल्यावर समजले की किल्याच्या अर्ध्याअधिक चढाईपर्यन्त डांबरी व कॉम्क्रीट चा रस्ता झाला आहे. असेच मुळशीतील घनगडावर देखील झाले आहे. अशाप्रकारे रस्ते करण्यामुळे अनेकांची सुविधा होते हे खरे पण श्रम कमी झाल्याने, ज्यांना इतिहासातील "ती" ला पहीली वेलांटी की दुसरी वेलांटी हे देखील माहीत नाही अशा अनेक हवश्या, गवश्या व नवश्यांना किल्ल्यावर पोहोचणे सुलभ झालेले आहे. ज्यांना निसर्ग शिष्टाचार, नेचर इटीकेट्स माहीत नाहीत अशा हजारो लोकांना सहज पणे इथे पोहोचता येते. किल्ले सर्वांनीच पहावेत, पण जर किल्ल्यांचे किल्लेपण , पावित्र्य जर अशा लोकांच्या येण्याने नष्ट होणार असेल तर अशा लोकांनी किल्ल्यावर न आलेलेच बरे. अगदी साध्या गोष्टींचे दुर्ग संस्कार, निसर्गसंस्कार यांवर झालेले नसतात हे या ट्रेक वेळी जाणवले.

उदा - किल्ला किंवा कोणताही डोंगरावर चढताना किंवा उतरताना आपले दोन्ही हात मोकळे असावयास हवेत. त्यामुळे नैसर्गिक रीत्या शरीराचे संतुलन होण्यास मदत होते. कित्येक लोक किल्ला चढताना किंवा उतरताना एका हातात पाण्याची बाटली व दुस-या हातात "जीव गेलेली काठी" घेऊन दिसले. ब-याच लोकांना मी समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासारख्याचे ऐकेल तो धाडसी तरूण कसला, ह्या आविर्भावात हे लोक चढत किंवा उतरत होते. (त्यात तोरणा तर गरुडाचे घरटे आहे, पुण्यातील सर्वात उंच किल्ला व पर्वत सुध्दा)...

किल्ला चढताना एका हातात ज्या पाण्याने भरलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या असतात त्या, बाटलीतील पाणी संपल्यावर वाटेवरच टाकणे, किंवा किल्ल्यावर कुठे ही टाकणे ही कृती इतकी सामान्य झाली आहे की लोक हे देखील विसरले आहेत की ही विकृती आहे. असेच प्लास्टीक पिशव्यांच्या बाबतीत. बिन्नीच्या दरवाज्याने आत जातान, देवळीतच पडलेला प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच/ढिग च स्वागत करतो, त्यातच वर चढुन आलेला बहादराच्या हाती जर मोकळी बाटली असेल तर त्याला कुणीही न सांगता तो निर्लज्ज पणे तिथेच हातातील बाटली टाकुन मोकळा होतो. प्लास्टीक च्या पिशव्या, थर्माकोलच्या जेवणाच्या खरकाट्या पत्रवाळ्या, तंबाखुच्या मोकळ्या पुड्या, प्लास्टीकचे ग्लास...अरे काय हा कर्म दरीद्रीपणा. शिवाजी महाराजांच्या इतक्या महान ऐतिहासिक वारश्यास ह्या लोकांनी कचराकुंडी करुन टाकावे यास कर्मदरीद्री पणा नाही म्हणायचे तर आणखी काय?

किल्ला चढताना, किंवा उतरताना, अति उत्साहाच्या भरात, हे नवशे, गवशे, हवशे इतक्या मोठमोठ्या आवाजात किंचाळतात की जणु असे किंचाळल्याने त्यांना कुणीतरी शाबासकी देणार आहे. निसर्गाच्या अविरत अशा शांततेमध्ये देखील एक संगीत आहे. पक्षांची किलकील, उन्मत्त वा-याचा गोंगावणारा आवाज, अधुन मधुन येणारे प्राण्याचे, माकडांचे, भेकरांचे , मोरांचे आवाज.. वा-यामुळे सळसळणा-या गवताचा, झाडांच्या पानांचा आवाज, हे सगळे आपणास निसर्गातील सांमजस्य, हार्मनी चे दर्शन घडवतात. आणि आपण निसर्गात जाऊन काय करतो तर या सगळ्या हार्मनी मध्ये विरजन घालुन ही हार्मनी नासवतो. आपण एक दिवस तिकडे जातो व आरडाओरड करुन तेथील परीस्थितीकीस उध्द्वस्त करतो. कुणी दिला आपणास अधिकार निसर्गातील , तिथे वास्तव्यास असणा-या प्राणीमात्रांच्या , निसर्गघटकांच्या एकतानतेस नष्ट करण्याचा?

किल्ल्यावर जाणे म्हणजे जत्रा आहे काय?
साधारणतः कोणताही किल्ला पाहायचाअसेल तर जास्तीत जास्त किती सदस्य असावेत तुमच्या समुहामध्ये? ५, १० जास्तीत जास्त १५..त्यापुढे जर सदस्य संख्या गेली तर तुमचे दुर्गदर्शन होणार नाही, ती जत्रा होईल. परवा असाच एक १५० लोकांचा ग्रुप किल्ला पाहायला आला. या ग्रुपचे काही सदस्य किल्ला चढत असतानाच काही सदस्य किल्ला उतरत होते. कुठे आहे "टीम वर्क". सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा देखील संस्कार निसर्ग पर्यटनामधुन झाला पाहीजे. सदस्य मागे पुढे होणे म्हणजे फार गंभीर बाब आहे. जी निसर्गाच्या रौद्र रुपाच्या दर्शना्साठी आपणास वाट मोकळी करुन देते. अवघड, अपरीचीत वाटा, तीन चारशे फुट खोल अशा द-या, यात जर तुमच्या ग्रुप मधील कुणी भोवळ येऊन, चक्कर येऊन, किंवा हाता पायाला जखम होऊन पडला तर, त्याचे परीणाम अति भयंकर होतात. प्रसंगी जीव ही गेले आहेत, तेही तोरणा किल्ल्यावरच.
एवढ्या मोठ्या संख्येने किल्ल्यावर जाणे म्हणजे सोबत तेवढाच कचरा घेऊन जाणे होय. पायथ्याशी असलेल्या गावातुन हॉटेल वाल्याला या १५० लोकांच्या जेवणाची ऑर्डर होती. यासाठी तयार जेवण किल्ल्यावर घेऊन जाणारे काही लोक ही दिसले, की जे जेवणाची पोती, अक्षरक्षः पोती, डोक्यावर घेऊन चढत होती. या लोकांनी किल्ल्यावर बराच कचरा केला. आरडाओरड, बीभत्स गाणी, नाच...अरेरे..अशोभनीय असे हे वर्तन पाहुन खरच राग येत होता, पण नाइलाज होता..कुणी ही ऐकण्यच्या मनस्थितीते नव्हते. अगतिकता.

नोकरी धंद्या निमित्त पुण्याअत आलेले काही हिन्दी भाषिक तरुण सुध्दा दिसले. ज्यांना फक्त ट्रेकींग करायचे होते. त्यांना ना धड शिवाजी राजे माहीत,, न तोरण्याचा इतिहास. मी काही ग्रुप्सना जमेल तसे माहीती सांगण्याचा पर्यत्न केला त्यांना तो आवडला ही. यातील बरेच लोक निसर्गाप्रती संवेदन असलेले जाणवले. त्यांचा सर्व कचरा ते पुन्हा त्यांच्याच बॅगांमध्ये ठेवीत होते. मी त्यांचे कौतुक केले.

या सर्व निराशेच्या गर्तेत एक आशेचा किरण ही दिसला..
मला शिवणे, पुणे येथील एक तरुणांचा ग्रुप भेटला. त्यातील एकाने मला ओळखले. व दोन मिनिटे त्यांच्या गप्पा मारता आल्या. हे १५-२० तरुण गेली बरीच वर्षे न चुकता १४-१५ ऑगस्ट ला तोरणा किल्ल्यावर येतात व ध्वजवंदन करुन किल्ला सफाईचे काम निरपेक्ष हेतुंने करतात. यातील "आदेश पायगुडे" या तरूणास मी ओळखतो, म्हणुन फक्त त्याचाच नामोल्लेख करीत आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन व सहकार्य करणे हे आपण सर्वांनी केले पाहीजे.

किल्ला म्हणजे नुसती सहल नाही, किल्ला म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहे.
हे प्रेरणास्त्रोत स्वच्छ, सुंदर व पवित्र राहावयास हवेत. त्यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षणासोबतच कृतीशील होणे गरजेचे आहे

http://nisargshala.in

Monday, August 1, 2016

आणि दानव बाहेर येतो..

आणि दानव बाहेर येतो..

काल मढे घाटात जाण्याचा योग आला. व मढे घाटाची लागलेली वाट पाहुन त्वरीत घरची वाट पकडली...अंदाजे ७-८ वर्षापुर्वी पहिल्यांदा तिकडे गेलो असीन , तेव्हाचा मढे घाट व आत्ताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. माहीती तंत्रज्ञान, सोशल मीडीया मुळे माहीती लवकर प्रसारीत होत आहे. त्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पर्यटक तिथे येत, सध्या वीकयेंड ला किमान ४०० मोटारगाड्या, ५०० ते ६०० मोटारसायकली येत आहेत. म्हणजे दिड ते दोन हजाराच्या आसपास पर्यटक येत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला हे खरे पण ज्या सुंदर निसर्गाच्या पर्यटनाचा आनंद घ्यायला लोक येतात, त्या निसर्गाचे इतके नुकसान करीत आहेत की येत्या ५-१० वर्षात, मढे घाट दारुच्या, बीयरच्या, प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक पिशव्यांचा खच असलेला कचरा डेपो होईल की काय अशी भीती वाटते आहे. क्किती घाणेरडे प्रकार पर्यटनाच्या नावाखाली होत आहेत की ते पाहुन तळपायाची आग मस्तकात जाते. मोटारसायकल स्वार, तरुण अतिउत्साही इतके निसर्गाच्या प्रेमात पडतात की त्यांनी दिलेल्या आरोळ्या, किंचाळ्या, आरडणे ओरडणे यामुळे बाकीचे पर्यटकच नाही तर पशु, पक्षी दगड धोंडे सुध्दा क्रुध्द होतील..दुसरा प्रकार पाहायला मिलतो तो म्हणजे, मढे घाटात येऊन दारु पार्टी करणा-यांचा..यांचा सरंजाम एवढा भारी की हे लोक्स एखादा टेंपो घेऊन, त्यात गॅस सिलींडर, मटण, भाज्या, भांडी आणी सर्वात म्हहत्वाचे म्हणजे अमर्याद दारु, मग हे लोक्स घाटमाथ्यावर कुठ तरी राहुटी लावुन साग्र संगीत पार्टी करतात. तिसरा प्रकार कार मधुन येणारे पण थोडे शिकलेले लोक्स, गाडी मधील मुझ्यिक सिस्टम मोटःया आवाजात लावुन रस्त्यात मधोमध , लाज सोडुन हिडीस नाच गाणे करणारा हा प्रकार...आणि एक प्रकार आहे, तो म्म्हणजे पावसाने भिजलेल्या माता भगिनींकडे वासनांध नजरेने पाहणारा, मध्येच बीभत्स कॉमेम्टस पास करणारा......व सर्वात केविलवाणी पर्यटकांचा प्रकार म्हणजे वरील सर्व प्रकारच्या लांडग्यांपासुन स्वतःचे व स्वःतसोबत असलेल्या स्त्रियांची काळजी वाहत, दबुन दबुन, हळु हळु, जमले तर निसर्गाचा आनंद घेणारा सामान्य पर्यटक..
माणसांनी खरच का स्वतःच्या उरात एवढ्या भावंनांना दाबुन ठेवलेले असते की संधी मिळताच, किंवा आपल्या न ओळखणारे इथे कोणी ही नाही असे दिसताच, पोलीस नाही असे दिसत्ताच ह्या भावनांच उद्रेक असा व्हावा की मानवाच्या आत दडलेला "दानव"च बाहेर यावा?



Sunday, July 24, 2016

ढोंगी दलितवाद

तथाकथित विज्ञानवादी, बुध्दीवादी, विवेकवादी विचारवंत (म्हणजेच काय तर झम्डु बामसेफी, ब्रिगेडी बांडगुळं ,फुरोगामी) पुरोगामीत्वाचा, विज्ञानाचा बुरखा ओढुन हे ढोंगी खरतर बहुसंख्यांची फसवणुक करीतह आहेत. यांना पाच हजार वर्षांची पिळवणुक दिसते, व सतत सतत त्या पिलवणुकीचे भांडवल करीत दलित साहीत्य काय,दलित सम्मेलन, दलित सिनेमा काय, दलित चित्रकला काय,,,,,नाही नाही ते प्रकार क्करुन दलितांचे दलितपण टिकवुन ठेवले आहे. आज जर आपण हे मान्य जरी केले की हजारो वर्षे एका विषीश्ट वर्गावर अन्याय झाला होता, व समानतेची वागणुक दिली गेली नाही, तरी दुसरीकडे गेल्या ७० वर्षातल हे वास्तव ह्या बेंडसाळांना का दिसत नाही की ह्याच भारयीत समाजाने, संविधान शिरसावंद्य मानीत, समरसते ची स्थापना केली. हो हाच तो भारतीय समाज आहे ज्याने संविधानाला डोक्यावर घेतल व कालसंगत परीवर्तन आत्मसात केल. कदाचित हजार वर्षात जेवढ्या अन्यायाच्या घटना झाल्या असतील त्यापेक्षा एक टक्का तरी कमी झाल्यात की नाही? जर झाल्या असतील तर त्याचे श्रेय जाते ते इथल्या परीवर्तन शील व विकसनवादी समाजमनाला. बाबासाहेबांनी दलि*आचा दलितपणा घालवण्यासाठी आयुष्य घालवले आणी ही बेंडसाळं त्याच बाबासाहेबांचे नाव घेऊन घेउन दलितपणा जीवंत ठेवीतात.(खरतर दलित हा शब्द वापरणे म्हणजे अवघड जातय, नकोस वाटतय, पण इलाज नाही)..
दलित साहित्य काय, दलित चळवळ काय, अरे काय हा वेडेपणा? जातीव्यवस्थेचे निर्मुलन करायचे ना? मग ह्या शब्दाने सुरु होणा-या सगळ्या चळवळी बंद करा. संघाचे मला या बाबतीत पटते, संघाच्या शब्दकोषात हा शब्दच नाही. तरी ही संघ जातीयवादी, मनुवादी. मनुवादी म्हणुन हिन्दुंची अवहेलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या या बेंडसाळांनी पहिल्यांदा "दलि*" हा शब्द वापरणे बंद केले तर त्यांच्या पुरोगामीत्वाची थोडी तरी प्रचीती येईल.

Wednesday, July 13, 2016

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे ख्रिश्चन मिशनरी..

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे ख्रिश्चन मिशनरी..

काल ससुन हॉस्पीटल मध्ये गेलो होतो. सरकारी , गोरगरीबांचा दवाखाना. लांब लांब गावा वस्त्यातुन लोक तिथे उपचारासाठी येत असतात, तसेच पेशंट्चे नातेवाईक सुध्दा व्हरांड्यांत, जागा मिळेल तिथे बस्तान मांडतात, ह्या व अशा अनेक कारणामुळे तिथे गर्दी व अस्वच्छता वाढलेली आहे. मी ज्या उपचारांकरीता गेलो होतो, ते व्यवस्थित झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान व काळजीवाहु कर्मचारी सेवक व डॉक्टर्स आहेत.
एक अत्यंत वाईट बाब तिथे ही निदर्शनास आली. व्हरांड्यात बसलेल्या सर्वच्या सर्व माणसांकडे "नवा करार" नावाचे , नवे कोरे पुस्तक दिसले. उत्सुकतेपोटी मी एका मावशींना विचारले हे काय तर त्या म्हणाल्या "आजार घालवण्यासाठी एका मॅडम ने हे पुस्तक वाचायला सांगितले व जमल्यास शेजारच्या एका मंदीरात यायला सांगितले. मॅडम कुठे आहे हे मी विचारले, त्यांना सांगता नाही आले. मी शोधाशोध केली पण कुणी सापड्ले नाही.
पण ख्रिश्चन गिधाड म्हणजेच मिशनरी लोक किती खालच्या स्तरावर जाऊन धर्मांतराचे काम करीतात हे पुन्हा एकदा दिसले.

Wednesday, July 6, 2016

प्रासंगिक - गोरक्षक आणि बुध्दीवादी

प्रासंगिक - गोरक्षक आणि बुध्दीवादी
आजच टीव्ही वर सकाळी सकाळी बातम्या पाहताना एक बातमी सांगितली गेली. भारतात एक संस्था आहे, प्राणी प्रेमी संंस्था. या संस्थेने न्यायालयात एक याचिका दाखल केली की पाळीव कुत्र्यांच्या संगोपनासाठी नियमावली तयार करुन कुत्रे पाळणा-या माणसांवर ते नियम पाळणे बंधनकारक करण्यासाठी, व न्यायालयाचे तसा आदेश ही काढला.
हे एवढ्या साठी सांगतोय की अशा प्रकारे कुत्र्या मांजरांसाठी काम करणा-या संस्थे विषयी साहजिकच आपल्या मनात एक कौतुकाची भावना येते, त्यात काम करणारे लोक किती दयाळु, कनवाळु आहेत व ते खरोखर मनुष्य म्हणुन घेण्यास पात्र आहेत असे वाटते.
आता विरोधाभास पहा, गाय, बैल यांची कत्तल होऊ नये म्हणुन काम करणारे मात्र याच देशात तथाकथित बुध्दीवाद्यांकडुन, धर्मनिरपेक्षतावाद्याकंडुन "टिकेस" पात्र होतात...आहेना गम्मत?

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

गेल्या ८-१० दिवसात इस्लामी दहशतवाद्यांनी ४-५ मोठे मोठे हल्ले जगभरात केलेत.
त्याच्यावर हिंदुत्व-हिंदुत्ववादी-संघी-ब्राम्हण्यवादी-पेठी इत्यादी इत्यादी शब्द सर्रास वापरणाऱ्या तथाकथित पुरोगामित्वाचा बुरखा घातलेल्या मुस्लिमांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे ..
*त्यांना खरा इस्लाम कळला नाही.
*इस्लाम हे शिकवत नाही.
*कुराण असे शिकवत नाही.
*कुराणाने असे कधीच सांगितले नाही.
*पैगंबराने असे कधी सांगितले नाही.
*इस्लाम हा शांततेचा श्रम आहे.
*इस्लाम हा पैगंबराने जगाला दिलेली देणगी आहे.
*त्यांचा हा इस्लाम असेल तर हा इस्लाम आमचा नाही.
*हे त्यांचे राजकारण आहे.
इत्यादी इत्यादी ..
तर जगभरात लफडे करणाऱ्या सगळ्याच इस्लामी दहशतवाद्यांचे म्हणणे असते कि ..
*हाच खरा इस्लाम.
*इस्लाम हेच शिकवतो.
*कुराणात हेच लिहिले आहे.
*कुराण हेच सांगते.
*इतरांना कुराण समजलेच नाही.
*पैगंबरांनी हेच केले आहे.
*इस्लाम हा जगावर राज्य करण्यासाठी आला आहे.
*आमचा इस्लाम हाच खरा इस्लाम.
*आमचा धर्म आणि राजकारण हेच आहे.
____*____*____*____*____*___*____
काय आहे ना, ह्या दोन्ही बाजू याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही - त्याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही अस एकमेकांबद्दल बोलून जगाला मुर्खात काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
जर इतक्या वर्षात कोणालाच इस्लाम-कुराण समजल नसेल तर मग ते ठेवलय कशाला? कोणाला मुर्खात काढत आहेत हे दोन्ही गट ..
आहात ना पुरोगामी ? मग नाकारा इस्लाम-कुराण .. आहे तयारी ? ..
करा इस्लामची-कुराणाची-पैगंबराच्या आयुष्याची चिकित्सा ? आहे तयारी ? ..
गैरमुस्लिमांच्या टोळ्यांवर हल्ले, त्यातील पुरुषांची गळा चिरून हत्या करणे, त्यामधील स्त्रियांना गुलाम बनवून सेक्ससाठी आपल्या मुलांना देणे-त्यांना वाटले तर ते त्या स्त्रिया इतरांना विकू हि शकत होते ..इत्यादी गोष्टी तर पैगंबर असल्यापासून सुरु आहेत .
आता सांगा कि दहशतवादी कृत्य आणि इस्लाम वेगळे कसे ?
ब्राम्हण्य-हिंदुत्ववादी-संघी-मनुवादी असे शब्द सर्रास वापरता ना ? मग आता वापरा बर ह्या दहशतवाद्यांविरुद्ध कुराणवादी-पैगंबरवादी-हिरवे दहशतवादी असे शब्द वापरून टीका..
कधीतरी म्हणा कि इस्लाममध्ये-कुराणामध्ये-पैगंबराच्या आयुष्यात काही चुका आहेत, त्या आता काळानुरूप दुरुस्त केल्या पाहिजेत.आहे तयारी?
इस्लाम हि पैगंबराणे जगाला दिलेली देणगी आहे अस इस्लामचा स्थापनेपासूनचा इतिहास बघता म्हणावस तरी कस वाटत ?
इतर धर्मियांवर टीका करण्यापेक्षा - इतर धर्मांची चिकित्सा करण्यापेक्षा तेवढा वेळ आणि अभ्यास स्वताच्या धर्माला आणि धर्मबांधवांना दिला ना तर बर होईल ..
इस्लाम विरुद्ध इतर ..
बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या २० लोकांमध्ये ९ इटालियन , सात जपानी, एक अमेरिकन, एक भारतीय म्हणजे एकूण १८ . मारल्या गेलेल्या २० मध्ये केवळ एक बांगलादेशी आहे आणि इतर सगळे विदेशी आहेत.
म्हणजे हि लढाई मुस्लीम विरुद्ध गैरमुस्लिम अशीच होती.इस्लामची लढाई कोणाबरोबर आहे हे तर स्पष्ट झाल.
हे असच सुरु राहील तर जगात इस्लामवर बंदी येईल आणि हि वेळ देखील फार लांब नाही .
बर्याच मुस्लीम विचारवंतांचे म्हणणे असते कि इस्लामी आतंकवादाचे सगळ्यात जास्त बळी मुसलमानच आहेत. नक्कीच त्याचं खर आहे. तरी सुद्धा कुराणा विरुद्ध न बोलन , इस्लामिक शिक्षनाविरुद्ध न बोलन , त्यामधील चुका दुरुस्त करण्याबद्दल न बोलन काय सांगत ? इस्लाममध्ये मुलभूत चुका आहेत हेच मान्य करायचं नाही - त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि आतंकवादाविरुद्ध बोलायचं ? .. ज्या दिवशी हे सुरु कराल त्या दिवशी दहशतवाद संपायला खरी सुरुवात होईल ..

Wednesday, May 25, 2016

महान भारत - होता, आहे व असेल ही..

महान भारत - होता, आहे व असेल ही..
#IndianAchievements
भारताचा भुतकाळ वैभवशाली होता हे म्हणण्यासाठी आपणास रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे यांचे दाखले देण्याची गरज नाही. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यन्त भारत विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर होता. बुध्दीप्रामाण्याची कास धरणा-यांनी, सप्तरंगांच्या दुनियेचे पाईक , विवेकवादी, नास्तिक आदी लोकांना ही भारताविषयी अभिमान वाटेल असा आपला भुतकाळ होता. जे देशभक्त आहेत खरतर त्यांना ह्या अशा दाखल्यांची गरज नाही, पण आपली देशभक्ती ही या देशात जन्माला आल्यामुळेच निर्माण झालेली असेल तर त्या देशभक्तांनी सुध्दा "पोकळ देशभक्तीच्या" गप्पा मारण्यापेक्षा वाचन केले व "भारत खरच महान होता" हे जाणुन घेऊन भारताचे महानत्व पुढे नतमस्तक झाले तर "सोने पे सुहागा" होउन जाईल.

श्री धरमपाल हे महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय व अनुयायी. गांधींजीच्या सांगण्यावरुन त्यांनी ब्रिटीश रेकॉर्डस चे अनुशीलन सतत २० वर्षे केले. या अभ्यासामध्ये त्यांनी तात्कालिन ब्रिटीश इस्ट ईम्डीया कंपनीचा ब्रिटीश संसदेशी, सांसदांशी, शासनाशी झालेला पत्र व्यवहार, विविध रीपोर्ट्स, भारतातील ब्रिटीश अधिका-यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार, तसेच विविध अहवाल यांचा समावेश आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी ब्रिटीश संग्रहालये, अर्काईव्ह्स यांचा सखोल व निरंतर अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा मुळ हेतु ब्रिटीश पुर्व काळातील भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, शैक्षणिक स्थितीचा धांडोळा घेणे हा होता. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा परीपाक "द ब्युटीफुल ट्री" या नावाने प्रसिध्द केला गेला. यात एकुण पाच भाग आहेत.जिज्ञासुंसाठी या प्रबंधाची लिंक देत आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/beautifultree.pdf


Saturday, May 7, 2016

डोंगराला आग लागली

डोंगराला आग लागली

वणवा लागण किंवा लावण म्हणजे एक महाभयंकर अपराध आहे. ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की आपले बंधु आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे. डोंगराला आग लावल्यामुले आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत. दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या "वणवा" लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रमा करतात. पण ह्या वणव्याम्मुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.

आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा, शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते, तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

Friday, May 6, 2016

जातिव्यवस्था निर्मुलनातील एक अडसर - दलितपण

सेय नो टु कास्ट


अजुन किती दशके त्याच विटाळ कथा घेऊन बसणार. मान्य आहे विशिष्ट वर्गाबरोबर असा पक्षपात झाला, पण सर्व समाज, समाजाची आधारशीला, जे की संविधान आहे, ते संविधान, समाजातील बराच मोठ वर्ग ज्यांचे पुर्वजांनी भुतकाळात एका वर्गास अन्यायकारक, प्रसंगी अमानवीय वागणुक दिली होती.., तर ज्यांनी ही वागणुक दिली त्यांचे वंशजांनी (जैववैद्यक , निसर्गदत्त व सांस्कृतिक वारस) हे मान्य केले आहे की भुतकाळात जे झाले ते चुकिचे होते...व तसे आता ही होत असेल तर ते ही चुकीचे आहे...या व अश अन्य अनेक कारणांमुळे जर भारतीयांचे मग ते पंथाने काही ही असो, जर धर्मांतर होत असेल तर हे धर्मांतर चुकीचे नाही असे का आपणास म्हणायचे आहे. पीडा देणा-यांच्या वंशजांनी चुक मान्य केली तसे असुनही पुरेसे नसेल तर नक्की अपेक्षा तरी काय आहे? ज्यांनी अन्याय केले त्यांच्यांवर नरकात जाऊन खटले भरायचे की जे दिलगीर(वंशज) आहेत त्यांच्याशी गळा भेट करुन पुन्हा एक व्हायचे, व मातृभुची सेवा करायची?...मला अजुन ही "दलित" हा शब्द वापरायचा किंवा उच्चारायचा किंवा लिहायचा म्हंटले तरी नकोसे होते, कारण या शब्दासच आपण आपल्या डिक्शनरीमधुन काढुन टाकले तरच "दलितत्व" सुध्दा संपुष्टात येईल. पण जेवढी ही जबाबदारी दलितेतर लोकांची आहे तेवढीच ज्यांच्यांवर अन्याय झाला त्यांची ही नाही का? किती वर्षे आपण आपले दलितत्व सांभाळणार आहोत? बाबासाहेबांना हे दलितत्वच तर घालवायचे होते, व आज त्यांचेच काही(सगळे नाही) अनुयायी अजुनही तोच शिक्का स्वतःच्या कपाळी मारुन मढे उकरण्याचे काम अविरत करीत आहेत. आपल्या समाजातातील दोषांमुळे(ते ही भुतकाळातील) आपण जर ख्रिश्चन मिशन-यांचे षडयंत्रास पाठिंबा देत असु तर आपण आत्म परीक्षण करणे गरजेचे आहे.. तसेही मंगेश मुरुडकरांनी म्हंटल्याप्रमाणे ते उपाय गेली ८० वर्षे संघ अविरत पणे करीत आहे. संघात जात ,धर्म नाही. इथे फक्त हिन्दु आहेत..असे सर्व लोक जे स्वतःला सांस्कृतिक दृष्टा हिन्दु मानतात ते सर्व इथे आहेत, त्यात मुस्लीम ही आहेत, बौध्द आहेत, व ख्रिश्चन ही आहेत...फक्त राजकीय हेतुंसाठी व एक गठ्ठा मतदानसाठी तथाकथित दलित नेते अजुनही "दलितत्व" जीवंत ठेवीत आहेत...

"त्व" म्हणजे नेमके काय?

"त्व" म्हणजे नेमके काय?
मुळात हिन्दुत्वाला मुस्लीमत्वाच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता, याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात याच काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल...ब-याच दिवसांपासुन हे लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता, माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्या आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. अस्तु.

Wednesday, April 27, 2016

धर्मनिरपेक्षता आणि बेगडी धर्मनिरपेक्षता

धर्मनिरपेक्षता आणि बेगडी धर्मनिरपेक्षता

मुळात लोकांना "धर्मनिरपेक्षता" या शब्दाचा अर्थच माहीत नाही..ज्या देशांत या शब्दाची उत्पत्ती झाली त्या देशात या संकल्पनेचा अर्थ होता व आहे तो असा "राज्य व्यवस्था व धर्म व्यवस्था यांची फारकत".. पोपच्या जाचास कंटाळून राज्य व्यवस्थेमध्ये पोप किंवा धर्माचा(त्या भागातील ख्रिश्चन) ची ढवळाढवळ "धर्मनिरपेक्षते"मुळे संपुष्टात आली. शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणे योग्य आहे असे पाश्चात्य विचारकांना वाटणे व तसे घडले सुध्दा. पोप ची सत्ता संपल्यानंतरच ख-या अर्थाने युरोप ने औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रात भरारी घेतली...आपल्याकडे मात्र काही दीडशहाणे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ "सर्व धर्म समभाव" असा घेतात. "सर्व धर्म समभाव" या वाक्यातच या वाक्याचा फोलपणा दिसतो आहे. "समभाव" कधी ठेवला जातो, ज्यावेळी दोन वस्तु,व्यक्ति समान नसतात. समान नसल्यामुळेच "समभाव" ठेवला जातो..जसे आईसाठी सर्व मुलांसाठी समभाव समदृष्टी असते, प्रत्यक्षात ती भावंडे समान नसतात...एखादा शांत, मनमिळाउ तर एखादे गुंड वृत्तीचे असु शकते. पण मुल लहान आहे तोपर्यंतच माता "समभाव" ठेवते. मोठी झाल्यावर सत्मार्गावर येत नसेल तर आई त्या गुंड मुलाला हे जाणीव करुन देते की तु गुंड आहेस व तु बदलण्याची आवश्यकता आहे..व आई असे करते याचे कारण तिला त्या "गुंड" वृत्तीच्या मुलाची देखील काळजी असते. उगाचच ती " नाही बाळा, सोनुल्या, तु गुंड वृतीचा आहेस, व तु वेगळा आहेस व वेगळा व गुंड वृत्तीचा असल्याने तु बदलला नाहीस तरी चालेल, तुझी बाकीची भावंड बदलतील, तुझा मार , शिव्या, त्रास सहन करतील. तु मात्र असाच राहा, शहाणा माझा बाळ ते"...आई असे कधीही म्हणत नाही. तदवतच आपल्याकडील तत्वचिंतकानी , बुध्दीजीवी लोकांनी हे जाणुन घेणे गरजेचे आहे की मुळातच आगाऊ, उनाड, वात्रट वृत्तीच्या पंथांना पाठीशी घालणे सोडुन , त्यांना त्यांच्यातील उणीवा दाखवुन देणे गरजेचे आहे, नाही की त्यांना नुसतेच गोंजारणे....इस्लामच्या बाबतीतही कॉन्ग्रेस व डाव्या पक्षाच्या बुध्दीजीवी लोकांकडुन हेच घडले आहे...आता हे उनाड कार्ट इतक मगरुर झाल आहे की त्याला जो कोणी त्याची चुक दाखवायला जाईल त्या सज्जनास देखील भय दाखवुन शांत करीत आहे. व तथाकथित बुध्दी जीवी त्या सज्जनास च दुषण देण्यात स्वतःच्या बुध्दीची इतिकर्तव्यता मानीत आहेत.
धर्मनिरपेक्षते कडे येऊया पुन्हा...धर्म निरपेक्षता म्हणजे "सर्व धर्म समभाव" असे नसुन शासन व धर्म यांची फारकत असा आहे. शासकीय व्यवस्थापकीय अमंलबजावणीवर धर्माचा किंवा धर्ममतांचा प्रभाव पडु नये हे ही धम निरपेक्षते मध्ये अंतर्भुत आहे...पण मग तलाक, हज सबसिडी,अनुदाने, आरक्षणे,भोंगा वाजवणे,रस्ते अडवुन नमाज अदा करणे च्या बाबतीत धर्मनिरपेक्षता वाद्यांची ही "धर्मनिरपेक्षता" कुठे शेण खायला जाते की काय?

Tuesday, April 19, 2016

आम्ही दगड भले

आम्ही दगड भले

होय आम्ही दगडात देव शोधतो, व असा देव शोधताना आम्ही आमच्या देवाला मानीत नाहीत त्यांचा नरसंहार नाही करीत..होय आम्ही वृक्ष वेली मध्ये देव शोधतो, व जे आमच्या देवाला मानीत नाहीत त्यांच्यावर "जिझीया कर" लादीत नाही...होय आम्ही नद्यांमध्ये देव शोधतो, व जे आमच्या देवाला मानीत नाहीत त्यांना कनिष्ट वागणुक देत नाहीत...होय आम्ही ग्रह ता-यांमध्ये देव शोधतो, पण महिलांना मातृवत मानतो, व महिलांना बुरख्यात अडकवुन ठेवीत नाही,...होय आम्ही प्राण्यामंध्ये देव शोधतो पण देवाला खुष करण्यासाठी मुक्या प्राण्यांच्या कुर्बान्या पण आम्ही देत नाहीत...होय आम्ही माणसांमध्ये देव शोधतो पण दुस-या तला देव शोधण्यासाठी आम्ही कधीही दुस-यांना आमच्या सांप्रदायात परावर्तित नाही करीत....होय ह्या चराचरात आम्ही देव शोधतो, कारण आम्ही "हिन्दु" आहोत...

Wednesday, March 30, 2016

आर्यन इन्व्हेजन थेयरी चा खोटारडेपणा कधीच उघडा पडला आहे. या सिध्दांतामुळे आजपर्यन्त म्हणजे गेल्या जवळजवळ दोन शतकात भारताचे बरेच नुकसान केले व आजही आधुनिक भारताचे तुकडे करण्याचे काम हा सिध्दांत करीत आहे. आर्य भारतात बाहेरुन आले असे दोनशे वर्षापुर्वी म्हणताना ,ब्रिटीश वसाहतवाद्यांनी हे देखील म्हंटले होते की भारतात आलेले आर्य हे दुय्यम दर्जाचे किंवा वर्णमिश्रीत आर्य आहेत, तर अस्सल आर्य युरोपातच आहेत. त्यातुनच पुढे जर्मनी मध्ये कपोलकल्पित आर्य वंशाचा वृथा अभिमान जन्मास येऊन ,लाखो ज्युं च्या कत्तली झाल्या, युरोप ने दिडशे वर्षे भारत, आफ्रिका आदी देशांना लुटुन जे कमावले होते त्या सर्वांची होळी झाली. याला कारणीभुत होता हा " आर्य सिध्दांत" यानंतरच युरोप ने आर्य सिध्दांताला तिलांजली दिली....त्याचप्रमाणे, श्रीलंकेमध्ये झालेली यादवी(तमीळ विरुध्द सिंहली) सुध्दा याच खोट्या आर्य सिध्दांताचे फलित आहे. ज्या आर्य थेयरीला जन्म देणा-या युरोपाने नाकारले, विविध भारतीय अभ्यासकांनी सप्रमाण हे सिध्द केले की "आर्य" नावाची जाती, किंवा पंथ, किंवा वंश कधी ही अस्तित्वात नव्हते, त्याच "आर्यन इन्व्हेजन थेयरी" ला भारतातीलच काही लोक, विशेषतः कम्युनिस्ट, लेफ्टीस्ट, सोशलिस्ट, ब्रिगेडी, तथाकथित दलित चळवळीचे पुरस्कर्ते अजुन कवटाळुन बसले आहेत. भारतातील या विविध डाव्या विचारधारा फक्त आणि फक्त एका सिध्दांतावर लक्ष केंद्रीत करुन भारतात क्रांती(?) घडवुन आणण्याचे स्पप्न पाहत आहेत, पण ते त्यांच्या माकडचाळ्यांमध्ये इतके गुंतुन गेलेत की ही "आर्यन इन्व्हेजन थेयरी" च चुकीची आहे, हे सप्रमाण सिध्द झालेले त्यांना पचत नाही की पचवुन घ्यायचे नाही. म्हणुनच हे अजुनही "मुल निवासी" सारख्या ब्रिटीशांनी जन्माला घातलेल्या शब्दांचा उपयोग करुन भारतीयांस बहकवण्याचे काम करीत आहेत.

Monday, March 21, 2016

एक फसवणुक - तेरेसा

एक फसवणुक - तेरेसा

एक स्त्री, जिने स्वत;च्या देशा तील भुखमरी, गरीबी, रोगपीडीत लोक सोडुन परक्या देशात जाऊन सेवा केली, हि सेवा करताना लाखोंच्या संख्येने पीडीतांचे हाल हाल केले, त्यांचे धर्म परीवर्तन केले, कधी सेवेच्या नावखाली तर कधी पैश्याच्या आमिषाने लोकांच्या श्रध्देचा बळी घेतला. सेवा हे फक्त लेबल होते मुळ हेतु धर्म परीवर्तनाचा होता. ज्या ज्या लोकांची सेवा केली व मत परीवर्तन केले काय ते आज सर्वतोपरी दुःख यातना यापासुन मुक्त आहेत? त्यात ही चर्च ने या स्त्री ला "संतत्व " बहाल करण्याचे जाहीर केले. संतत्व जाहीर करण्यासाठी अशा पुराव्यांची आवश्यकता असते ज्यातुन हे सिध्द होईल की त्या व्यक्ति ने अलौकिक, लोकोत्तर असा चमत्कार केला आहे. व असा चमत्कार आधुनिक विज्ञानाला मान्य नाही, तरीही या स्त्री ला संत पणा मिळतोय...
भारतातील संतभुमीत, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सावता माळी, रोहीदास, मुक्ताबाई यांच्या पंक्तीला आता ही बाई बसणार? आम्ही भारतीय माऊलींचे संतपण त्यांच्या सर्वात मोठ्या चमत्कारामुळे मानतो, तो चमत्कार म्हणजे "ज्ञानेश्वरी", तुकारामांचा चमत्कार म्हणजे गाथा, नामदेवाचे ही असेच आहे. आमच्या सा-या संतांनी सामाजिक समरसतेचा मंत्र दिला तो होता "राम कृष्ण हरी", सर्वांसाठी एकच मंत्र, एकच मार्ग. आपल्या संतांनी कधी दुस-या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आनण्याचा प्रयत्न केला नाही. संत पण म्हणजे जर चमत्कार असेल तर, चर्च चे संत पण विज्ञानास व आम्हासही मान्य नाही, आणि जर या बाईच्या या चमत्कारांचा पुरावा खरच असेल तर, अंधश्रध्दा निर्मुलन समिती वाल्यांनी ताबडतोब या मृत स्त्री वर मरणोत्तर "जादु टोणा विरोधी " कायद्याअंतर्गत खटला का भरु नये?

Wednesday, February 10, 2016

सत्तांध ब्रिटीश ..

दहा आठवड्यांमध्ये व्हॉईसरॉय लॉर्ड लिंलिथगोअ ह्या ब्रिटीश अधिका-याने ३८ गेंडे, २७ बिबटे, १५ अस्वले आणि १२० पट्टेरी वाघांची शिकार केली.
वर्ष - १९३८, ठिकाण - भारत...तत्पुर्वी भारतात वाघांची संख्या लाखांच्या घरात होती असे एका अभ्यासात म्हंटले आहे. 
ब्रिटीशांच्या अशा पराक्रमाला ते "हंटींग पार्टी" म्हणत. अशाच एका हंटींग पार्टीचा फोटो खाली आहे. १९२० सालचा.

Monday, February 8, 2016

एकेश्वरवाद - सांप्रदायिक स्वातंत्र्यावर गदा आणतो.

एकेश्वरवाद - सांप्रदायिक स्वातंत्र्यावर गदा आणतो.

एकेश्वरवाद मुळातच तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर केलेला आघात आहे. जर धर्मनिरपेक्षता शिकवायचीच असेल तर ती त्यांना शिकवा की जे म्हणतात की आमचा मार्ग, पंथच योग्य व तुमचा अयोग्य. आमच्या पंथांच्या लोकांनाच सदगती मिळणार, इतरांना नाही. आमचा पंथ श्रेष्ट म्हणुन आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ट व इतर सर्व तुच्छ. आमच्याच आस्था महान, आमचाच देव महान, आमचाच ग्रंथ महान, आमचेच सर्व काही महान. भारतीय लोकांनी कधीही असा अट्टाहास केला नाही, भारतात अनेकेश्वरवाद हजारो वर्षे जोपासला गेलाय..
अरे ज्या लोकांवर हजारो वर्षे संप्रदायिक सहिष्णुतेचे संस्कार झालेत त्यांना तुम्ही धर्मनिरपेक्षता शिकवता? परदेशातुन आपल्या देशात आलेल्या ज्या दोन पंथांच्या संदर्भात आज देशात "सेक्युलॅरीजम खतरे मे है"चा आलाप गायला जातोय , नेमके तेच दोन सांप्रदाय एकेश्वरवादी आहेत. ते नुसतेच एकेश्वरवादी नाहीत तर विस्तारवादीही आहेत. अरे मुर्ख बेगडी धर्मनिरपेक्ष भारतीयांनो, आम्हाला नका शिकवु सांप्रदायिक सौहार्द, ते शिकवा फक्त देशाच्या बाहेरुन आलेल्या सांप्रदायांच्या अनुयायांना. तुम्ही ते कितीही शिकवा तरीही हे लोक, जिहाद केल्यावाचुन राहणार नाहीत किंवा विहीरीत पावाचे तुकडे टाकायचे थांबवणार नाहीत. त्यामुळे सेक्युलॅरीजमचे धडे भारतीयांना देणे बंद करा.