Wednesday, March 30, 2016

आर्यन इन्व्हेजन थेयरी चा खोटारडेपणा कधीच उघडा पडला आहे. या सिध्दांतामुळे आजपर्यन्त म्हणजे गेल्या जवळजवळ दोन शतकात भारताचे बरेच नुकसान केले व आजही आधुनिक भारताचे तुकडे करण्याचे काम हा सिध्दांत करीत आहे. आर्य भारतात बाहेरुन आले असे दोनशे वर्षापुर्वी म्हणताना ,ब्रिटीश वसाहतवाद्यांनी हे देखील म्हंटले होते की भारतात आलेले आर्य हे दुय्यम दर्जाचे किंवा वर्णमिश्रीत आर्य आहेत, तर अस्सल आर्य युरोपातच आहेत. त्यातुनच पुढे जर्मनी मध्ये कपोलकल्पित आर्य वंशाचा वृथा अभिमान जन्मास येऊन ,लाखो ज्युं च्या कत्तली झाल्या, युरोप ने दिडशे वर्षे भारत, आफ्रिका आदी देशांना लुटुन जे कमावले होते त्या सर्वांची होळी झाली. याला कारणीभुत होता हा " आर्य सिध्दांत" यानंतरच युरोप ने आर्य सिध्दांताला तिलांजली दिली....त्याचप्रमाणे, श्रीलंकेमध्ये झालेली यादवी(तमीळ विरुध्द सिंहली) सुध्दा याच खोट्या आर्य सिध्दांताचे फलित आहे. ज्या आर्य थेयरीला जन्म देणा-या युरोपाने नाकारले, विविध भारतीय अभ्यासकांनी सप्रमाण हे सिध्द केले की "आर्य" नावाची जाती, किंवा पंथ, किंवा वंश कधी ही अस्तित्वात नव्हते, त्याच "आर्यन इन्व्हेजन थेयरी" ला भारतातीलच काही लोक, विशेषतः कम्युनिस्ट, लेफ्टीस्ट, सोशलिस्ट, ब्रिगेडी, तथाकथित दलित चळवळीचे पुरस्कर्ते अजुन कवटाळुन बसले आहेत. भारतातील या विविध डाव्या विचारधारा फक्त आणि फक्त एका सिध्दांतावर लक्ष केंद्रीत करुन भारतात क्रांती(?) घडवुन आणण्याचे स्पप्न पाहत आहेत, पण ते त्यांच्या माकडचाळ्यांमध्ये इतके गुंतुन गेलेत की ही "आर्यन इन्व्हेजन थेयरी" च चुकीची आहे, हे सप्रमाण सिध्द झालेले त्यांना पचत नाही की पचवुन घ्यायचे नाही. म्हणुनच हे अजुनही "मुल निवासी" सारख्या ब्रिटीशांनी जन्माला घातलेल्या शब्दांचा उपयोग करुन भारतीयांस बहकवण्याचे काम करीत आहेत.

No comments:

Post a Comment