Wednesday, May 25, 2016

महान भारत - होता, आहे व असेल ही..

महान भारत - होता, आहे व असेल ही..
#IndianAchievements
भारताचा भुतकाळ वैभवशाली होता हे म्हणण्यासाठी आपणास रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे यांचे दाखले देण्याची गरज नाही. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यन्त भारत विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर होता. बुध्दीप्रामाण्याची कास धरणा-यांनी, सप्तरंगांच्या दुनियेचे पाईक , विवेकवादी, नास्तिक आदी लोकांना ही भारताविषयी अभिमान वाटेल असा आपला भुतकाळ होता. जे देशभक्त आहेत खरतर त्यांना ह्या अशा दाखल्यांची गरज नाही, पण आपली देशभक्ती ही या देशात जन्माला आल्यामुळेच निर्माण झालेली असेल तर त्या देशभक्तांनी सुध्दा "पोकळ देशभक्तीच्या" गप्पा मारण्यापेक्षा वाचन केले व "भारत खरच महान होता" हे जाणुन घेऊन भारताचे महानत्व पुढे नतमस्तक झाले तर "सोने पे सुहागा" होउन जाईल.

श्री धरमपाल हे महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय व अनुयायी. गांधींजीच्या सांगण्यावरुन त्यांनी ब्रिटीश रेकॉर्डस चे अनुशीलन सतत २० वर्षे केले. या अभ्यासामध्ये त्यांनी तात्कालिन ब्रिटीश इस्ट ईम्डीया कंपनीचा ब्रिटीश संसदेशी, सांसदांशी, शासनाशी झालेला पत्र व्यवहार, विविध रीपोर्ट्स, भारतातील ब्रिटीश अधिका-यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार, तसेच विविध अहवाल यांचा समावेश आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी ब्रिटीश संग्रहालये, अर्काईव्ह्स यांचा सखोल व निरंतर अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा मुळ हेतु ब्रिटीश पुर्व काळातील भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, शैक्षणिक स्थितीचा धांडोळा घेणे हा होता. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा परीपाक "द ब्युटीफुल ट्री" या नावाने प्रसिध्द केला गेला. यात एकुण पाच भाग आहेत.जिज्ञासुंसाठी या प्रबंधाची लिंक देत आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/beautifultree.pdf


No comments:

Post a Comment