Friday, May 6, 2016

"त्व" म्हणजे नेमके काय?

"त्व" म्हणजे नेमके काय?
मुळात हिन्दुत्वाला मुस्लीमत्वाच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता, याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात याच काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल...ब-याच दिवसांपासुन हे लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता, माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्या आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. अस्तु.

No comments:

Post a Comment