Wednesday, April 27, 2016

धर्मनिरपेक्षता आणि बेगडी धर्मनिरपेक्षता

धर्मनिरपेक्षता आणि बेगडी धर्मनिरपेक्षता

मुळात लोकांना "धर्मनिरपेक्षता" या शब्दाचा अर्थच माहीत नाही..ज्या देशांत या शब्दाची उत्पत्ती झाली त्या देशात या संकल्पनेचा अर्थ होता व आहे तो असा "राज्य व्यवस्था व धर्म व्यवस्था यांची फारकत".. पोपच्या जाचास कंटाळून राज्य व्यवस्थेमध्ये पोप किंवा धर्माचा(त्या भागातील ख्रिश्चन) ची ढवळाढवळ "धर्मनिरपेक्षते"मुळे संपुष्टात आली. शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणे योग्य आहे असे पाश्चात्य विचारकांना वाटणे व तसे घडले सुध्दा. पोप ची सत्ता संपल्यानंतरच ख-या अर्थाने युरोप ने औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रात भरारी घेतली...आपल्याकडे मात्र काही दीडशहाणे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ "सर्व धर्म समभाव" असा घेतात. "सर्व धर्म समभाव" या वाक्यातच या वाक्याचा फोलपणा दिसतो आहे. "समभाव" कधी ठेवला जातो, ज्यावेळी दोन वस्तु,व्यक्ति समान नसतात. समान नसल्यामुळेच "समभाव" ठेवला जातो..जसे आईसाठी सर्व मुलांसाठी समभाव समदृष्टी असते, प्रत्यक्षात ती भावंडे समान नसतात...एखादा शांत, मनमिळाउ तर एखादे गुंड वृत्तीचे असु शकते. पण मुल लहान आहे तोपर्यंतच माता "समभाव" ठेवते. मोठी झाल्यावर सत्मार्गावर येत नसेल तर आई त्या गुंड मुलाला हे जाणीव करुन देते की तु गुंड आहेस व तु बदलण्याची आवश्यकता आहे..व आई असे करते याचे कारण तिला त्या "गुंड" वृत्तीच्या मुलाची देखील काळजी असते. उगाचच ती " नाही बाळा, सोनुल्या, तु गुंड वृतीचा आहेस, व तु वेगळा आहेस व वेगळा व गुंड वृत्तीचा असल्याने तु बदलला नाहीस तरी चालेल, तुझी बाकीची भावंड बदलतील, तुझा मार , शिव्या, त्रास सहन करतील. तु मात्र असाच राहा, शहाणा माझा बाळ ते"...आई असे कधीही म्हणत नाही. तदवतच आपल्याकडील तत्वचिंतकानी , बुध्दीजीवी लोकांनी हे जाणुन घेणे गरजेचे आहे की मुळातच आगाऊ, उनाड, वात्रट वृत्तीच्या पंथांना पाठीशी घालणे सोडुन , त्यांना त्यांच्यातील उणीवा दाखवुन देणे गरजेचे आहे, नाही की त्यांना नुसतेच गोंजारणे....इस्लामच्या बाबतीतही कॉन्ग्रेस व डाव्या पक्षाच्या बुध्दीजीवी लोकांकडुन हेच घडले आहे...आता हे उनाड कार्ट इतक मगरुर झाल आहे की त्याला जो कोणी त्याची चुक दाखवायला जाईल त्या सज्जनास देखील भय दाखवुन शांत करीत आहे. व तथाकथित बुध्दी जीवी त्या सज्जनास च दुषण देण्यात स्वतःच्या बुध्दीची इतिकर्तव्यता मानीत आहेत.
धर्मनिरपेक्षते कडे येऊया पुन्हा...धर्म निरपेक्षता म्हणजे "सर्व धर्म समभाव" असे नसुन शासन व धर्म यांची फारकत असा आहे. शासकीय व्यवस्थापकीय अमंलबजावणीवर धर्माचा किंवा धर्ममतांचा प्रभाव पडु नये हे ही धम निरपेक्षते मध्ये अंतर्भुत आहे...पण मग तलाक, हज सबसिडी,अनुदाने, आरक्षणे,भोंगा वाजवणे,रस्ते अडवुन नमाज अदा करणे च्या बाबतीत धर्मनिरपेक्षता वाद्यांची ही "धर्मनिरपेक्षता" कुठे शेण खायला जाते की काय?

No comments:

Post a Comment