Wednesday, May 25, 2016

महान भारत - होता, आहे व असेल ही..

महान भारत - होता, आहे व असेल ही..
#IndianAchievements
भारताचा भुतकाळ वैभवशाली होता हे म्हणण्यासाठी आपणास रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे यांचे दाखले देण्याची गरज नाही. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यन्त भारत विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर होता. बुध्दीप्रामाण्याची कास धरणा-यांनी, सप्तरंगांच्या दुनियेचे पाईक , विवेकवादी, नास्तिक आदी लोकांना ही भारताविषयी अभिमान वाटेल असा आपला भुतकाळ होता. जे देशभक्त आहेत खरतर त्यांना ह्या अशा दाखल्यांची गरज नाही, पण आपली देशभक्ती ही या देशात जन्माला आल्यामुळेच निर्माण झालेली असेल तर त्या देशभक्तांनी सुध्दा "पोकळ देशभक्तीच्या" गप्पा मारण्यापेक्षा वाचन केले व "भारत खरच महान होता" हे जाणुन घेऊन भारताचे महानत्व पुढे नतमस्तक झाले तर "सोने पे सुहागा" होउन जाईल.

श्री धरमपाल हे महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय व अनुयायी. गांधींजीच्या सांगण्यावरुन त्यांनी ब्रिटीश रेकॉर्डस चे अनुशीलन सतत २० वर्षे केले. या अभ्यासामध्ये त्यांनी तात्कालिन ब्रिटीश इस्ट ईम्डीया कंपनीचा ब्रिटीश संसदेशी, सांसदांशी, शासनाशी झालेला पत्र व्यवहार, विविध रीपोर्ट्स, भारतातील ब्रिटीश अधिका-यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार, तसेच विविध अहवाल यांचा समावेश आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी ब्रिटीश संग्रहालये, अर्काईव्ह्स यांचा सखोल व निरंतर अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा मुळ हेतु ब्रिटीश पुर्व काळातील भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, शैक्षणिक स्थितीचा धांडोळा घेणे हा होता. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा परीपाक "द ब्युटीफुल ट्री" या नावाने प्रसिध्द केला गेला. यात एकुण पाच भाग आहेत.जिज्ञासुंसाठी या प्रबंधाची लिंक देत आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/beautifultree.pdf


Saturday, May 7, 2016

डोंगराला आग लागली

डोंगराला आग लागली

वणवा लागण किंवा लावण म्हणजे एक महाभयंकर अपराध आहे. ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की आपले बंधु आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे. डोंगराला आग लावल्यामुले आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत. दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या "वणवा" लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रमा करतात. पण ह्या वणव्याम्मुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.

आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा, शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते, तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

Friday, May 6, 2016

जातिव्यवस्था निर्मुलनातील एक अडसर - दलितपण

सेय नो टु कास्ट


अजुन किती दशके त्याच विटाळ कथा घेऊन बसणार. मान्य आहे विशिष्ट वर्गाबरोबर असा पक्षपात झाला, पण सर्व समाज, समाजाची आधारशीला, जे की संविधान आहे, ते संविधान, समाजातील बराच मोठ वर्ग ज्यांचे पुर्वजांनी भुतकाळात एका वर्गास अन्यायकारक, प्रसंगी अमानवीय वागणुक दिली होती.., तर ज्यांनी ही वागणुक दिली त्यांचे वंशजांनी (जैववैद्यक , निसर्गदत्त व सांस्कृतिक वारस) हे मान्य केले आहे की भुतकाळात जे झाले ते चुकिचे होते...व तसे आता ही होत असेल तर ते ही चुकीचे आहे...या व अश अन्य अनेक कारणांमुळे जर भारतीयांचे मग ते पंथाने काही ही असो, जर धर्मांतर होत असेल तर हे धर्मांतर चुकीचे नाही असे का आपणास म्हणायचे आहे. पीडा देणा-यांच्या वंशजांनी चुक मान्य केली तसे असुनही पुरेसे नसेल तर नक्की अपेक्षा तरी काय आहे? ज्यांनी अन्याय केले त्यांच्यांवर नरकात जाऊन खटले भरायचे की जे दिलगीर(वंशज) आहेत त्यांच्याशी गळा भेट करुन पुन्हा एक व्हायचे, व मातृभुची सेवा करायची?...मला अजुन ही "दलित" हा शब्द वापरायचा किंवा उच्चारायचा किंवा लिहायचा म्हंटले तरी नकोसे होते, कारण या शब्दासच आपण आपल्या डिक्शनरीमधुन काढुन टाकले तरच "दलितत्व" सुध्दा संपुष्टात येईल. पण जेवढी ही जबाबदारी दलितेतर लोकांची आहे तेवढीच ज्यांच्यांवर अन्याय झाला त्यांची ही नाही का? किती वर्षे आपण आपले दलितत्व सांभाळणार आहोत? बाबासाहेबांना हे दलितत्वच तर घालवायचे होते, व आज त्यांचेच काही(सगळे नाही) अनुयायी अजुनही तोच शिक्का स्वतःच्या कपाळी मारुन मढे उकरण्याचे काम अविरत करीत आहेत. आपल्या समाजातातील दोषांमुळे(ते ही भुतकाळातील) आपण जर ख्रिश्चन मिशन-यांचे षडयंत्रास पाठिंबा देत असु तर आपण आत्म परीक्षण करणे गरजेचे आहे.. तसेही मंगेश मुरुडकरांनी म्हंटल्याप्रमाणे ते उपाय गेली ८० वर्षे संघ अविरत पणे करीत आहे. संघात जात ,धर्म नाही. इथे फक्त हिन्दु आहेत..असे सर्व लोक जे स्वतःला सांस्कृतिक दृष्टा हिन्दु मानतात ते सर्व इथे आहेत, त्यात मुस्लीम ही आहेत, बौध्द आहेत, व ख्रिश्चन ही आहेत...फक्त राजकीय हेतुंसाठी व एक गठ्ठा मतदानसाठी तथाकथित दलित नेते अजुनही "दलितत्व" जीवंत ठेवीत आहेत...

"त्व" म्हणजे नेमके काय?

"त्व" म्हणजे नेमके काय?
मुळात हिन्दुत्वाला मुस्लीमत्वाच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता, याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात याच काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल...ब-याच दिवसांपासुन हे लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता, माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्या आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. अस्तु.