Monday, April 7, 2014

ग्लोबल इनफॉर्मेशन व्हिलेज चे खरेखुरे गावकरी -

"वसुधैव कुटुंबकम", 'ग्लोबल विलेज' हे व या अर्थाचे बरेचसे शब्द हल्ली आपणास सर्रास ऍकावयास मिळतात. बरेच वाचावीर आजकाल आपल्या भाषणातुन देखील या सारख्या शब्दांचा उल्लेख करताना आढ्ळतात. त्यातच भर म्हणुन की काय इलेक्ट्रॉनिक्स मीडीया व इंटरनेट मुळे वरील शब्दांची अंशतः अनुभुती सुध्दा येते आहे. Live feed, Live telecast, status update मुळे जगभरात कुठेही काहीही घटना घडत असताना आपण बसल्याजागी ते पाहु, ऍकु शकतो.व स्वतःला अपडेट करू शकतो.या सर्व मीडीयाने माहीतीची अनंत द्वारे जनसामांन्याठी खुली केली आहेत. या जगात क्षणोक्षणी नवीनतम माहीती जन्म घेत आहे. ही माहीती कधी न्युज च्या तर कधी स्टेटस अपडेट च्या रूपाने आपणासमोर येते आहे. माहीतीचे एक प्रकारे बंबार्डींगच आपणावर सदैव सुरू आहे. ज्या आधुनिक साधनांद्वारे माहीती आपणापर्यंत येते त्या साधनांना एकच कार्य करावयाचे आहे ते म्हणजे माहीतीचे प्रक्षेपण, प्रसारंण. या साधनांना स्वतः चा आ.क्यु. नाही, त्यांना हे माहीत नाही की माहीती ज्यांच्या पर्यंत जाणार आहे त्यांचा स्तर कोणता आहे..माहीती मिळविणा-याचा शैक्षणिक स्तर,वैचारीक स्तर, आर्थिक स्तर,बौध्दीक स्तर,सामाजिक स्तर, आध्यात्मिक स्तर यापैकी कोणत्याच स्तराविषयी ही साधने अनभिज्ञ आहेत. यामुळे प्रचंड मोठा खजिना अचानक सापडावा व एखाद्या संमिश्र जमावाने त्यावर तुटुन पडावे व जे जे भावेल ते ते लुटुन न्यावे अशी काहीशी अवस्था सध्या सर्वत्र पहावयास मिळते आहे. माहीतीचे ज्ञानात रूपांतर होण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ती माहीती जशी आहे तशी गंतव्या पर्यन्त पोहोचणे.
तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास माहीती व डेटा हे समानार्थाने वापरले जाणारे शब्द आहेत. वस्तुस्थिती चे वर्णन म्हणजे डेटा किंवा माहीती. परंतु या माहीतीच्या महाजाळामध्ये उपभोक्त्यापर्यंत माहीती जशी च्या तशी येईलच याची खात्री नाही. माहीती मिळविणा-या पर्यंत येतानाच जर ही माहीती संस्कारीत होत असेल तर माहीती मिळविणा-याच्या मुलभुत, जन्मसिध्द 'माहीती मिळविण्याच्या' अधिकारावरच एक प्रकारे हा घाला आहे. याला उपभोक्ता सुध्दा तितकाच जबाबदार आहे. बाजारात जे विकले जाते तेच विक्रेता विकावयास ठेवतो. ग्राहकांनी स्वतःच्या प्रकृती व अभिरूची ला अनुसरुन खरेदी करावयास सुरूवात केली तर विक्रेता स्वतःच्या मर्जीप्रमाणे वस्तु विकणारच नाही. त्यामुळेच आधुनिक माहीती तंत्रज्ञानाच्या युगातील एक जबाबदार नागरीक या नात्याने ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे की माहीती निवडण्याच्या व नाकारण्याच्या आपल्या मुलभूत अधिकाराचा आपण जाणीव पुर्वक उपयोग करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्याचवेळी प्रसिध्दी माध्यमांनी सुध्दा माहीतीचे कमीत कमी संस्करण करून जनसामांन्यांपर्यन्त पोहोचवणे गरजेचे आहे. असे झाले तर कदाचित आपण ग्लोबल इनफॉर्मेशन व्हिलेज चे खरेखुरे गावकरी शोभुन दिसु.

2 comments:

  1. Can i have your email ID, I'm Dinesh D Rao Vavale from Bangalore, Had some queries related to Vavale

    ReplyDelete